|| भणंग पंचविशी ||
," यू. एस. मॅन, आय. टी. यार
चंगळबाजी अपरंपार
फांटक्या जीन्स, विटके टॉप्स
किंमत फक्त वीस हजार !! || १ ||
शिकायलाच, ठाम नकार
डोकं राहे गारेगार
फांटक्या जीन्स, विटके टॉप्स
किंमत फक्त वीस हजार !! || २ ||
पन्नास लाख मोजले, की
डिग्री हातोंहात तयार
फांटक्या जीन्स, विटके टॉप्स
किंमत फक्त वीस हजार !! || ३ ||
तेंव्हढे खिश्यांत नव्हतें, म्हणून
' दहावी नापास ' राहिलो, यार
फांटक्या जीन्स, विटके टॉप्स
किंमत फक्त वीस हजार !! || ४ ||
नोकरी देई ना सरकार
रांखीव जागांत मारामार
फांटक्या जीन्स, विटके टॉप्स
किंमत फक्त वीस हजार !! || ५ ||
' दहावी नापास ' उमेदवार
' आय. टी.’ शिवाय, कोण घेणार ?
फांटक्या जीन्स, विटके टॉप्स
किंमत फक्त वीस हजार !! || ६ ||
डॉलरमध्ये नाही पगार
‘ वेठबिगारी ' चा आधार
फांटक्या जीन्स, विटके टॉप्स
किंमत फक्त वीस हजार !! || ७ ||
अठरा तास राबराबून
कमाई पन्नास हजार
फांटक्या जीन्स, विटके टॉप्स
किंमत फक्त वीस हजार !! || ८ ||
‘ नायके ' ‘ रीबॉक ' घ्यायलाही
पुरत नाही पगार
फांटक्या जीन्स, विटके टॉप्स
किंमत फक्त वीस हजार !! || ९ ||
' फियाट ', नाही ' हयाट ' नाही
कसलं हें जिणं भिकार
फांटक्या जीन्स, विटके टॉप्स
किंमत फक्त वीस हजार !! || १० ||
हॉटेलांत भोजन तयार
‘ स्विग्गी ' फिरतोय दारोंदार
फांटक्या जीन्स, विटके टॉप्स
किंमत फक्त वीस हजार !! || ११ ||
फोन लावतां, सगळं हंजर
कांही मिळत नाही उधार
फांटक्या जीन्स, विटके टॉप्स
किंमत फक्त वीस हजार !! || १२ ||
क्रेडिट कार्डांवर झांलंय
माथीं, कर्ज भारंभार
फांटक्या जीन्स, विटके टॉप्स
किंमत फक्त वीस हजार !! || १३ ||
भरूं हप्ते जमलं तर
घालोंत खेंटे देणींदार
फांटक्या जीन्स, विटके टॉप्स
किंमत फक्त वीस हजार !! || १४ ||
आपलं आपण कमवा-उडवा
हा च ' नेकी चा व्यवहार '
फांटक्या जीन्स, विटके टॉप्स
किंमत फक्त वीस हजार !! || १५ ||
आपली ' स्पेस ' न् आपण बरे
हंवाय कुणाला जोडीदार ?
फांटक्या जीन्स, विटके टॉप्स
किंमत फक्त वीस हजार !! || १६ ||
नकोत, कमाई त वाटे
न् पोंरांटारांचं लेंढार
फांटक्या जीन्स, विटके टॉप्स
किंमत फक्त वीस हजार !! || १७ ||
कसलीं नातीं ? कुठली गोतीं ?
सारा खुळ्यांचा बाजार
फांटक्या जीन्स, विटके टॉप्स
किंमत फक्त वीस हजार !! || १८ ||
‘ लिव्ह इन ' मध्ये, कसं
विना जोखीम, हिरवंगार
फांटक्या जीन्स, विटके टॉप्स
किंमत फक्त वीस हजार !! || १९ ||
पटलं, तर ठीक, अथवा
विटलं, तर ' आप्पटबार '
फांटक्या जीन्स, विटके टॉप्स
किंमत फक्त वीस हजार !! || २० ||
आया-बापां चे, झालेत
हुकूमशहां चे अवतार
फांटक्या जीन्स, विटके टॉप्स
किंमत फक्त वीस हजार !! || २१ ||
अर्ध्या चड्ड्यांत फिरायची
इथं झालीय मारामार
फांटक्या जीन्स, विटके टॉप्स
किंमत फक्त वीस हजार !! || २२ ||
एकदां ' यू. एस.’ गांठली, की
आहेच कोण विचारणार ?
फांटक्या जीन्स, विटके टॉप्स
किंमत फक्त वीस हजार !! || २३ ||
‘ एच. वन बी. ’ साठी मरतोय
तोंवर तोंड गप्पगार
फांटक्या जीन्स, विटके टॉप्स
किंमत फक्त वीस हजार !! || २४ ||
तेंव्हढा लग्गा लागला, की
सगळं टांकून, छू पसार
यू. एस. मॅन, आय. टी. यार
चंगळबाजी अपरंपार
फांटक्या जीन्स, विटके टॉप्स
किंमत फक्त वीस हजार !! || २५ ||
*******************************
रविशंकर.
२१ मार्च २०२५.